Home > सामाजिक > ठाकर आदिवासींचे जीवन

काल महादेव खोरा , करंजखेडा, कन्नड येथे जाण्याचा योग आला. औरंगाबाद पासून साधारण 85 किमी अंतर आहे. येथे ठाकर आदिवासी राहतात. भेटीचे कारण होते त्या भागाची शिवार फेरी.
एक पाझर तलाव आहे तेथे, सांडाव्याच्या बाजूची भिंत खचल्यामुळे जो जानेवारी पर्यंत रिकामा होतो. आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो.
या वस्तीला जाण्यासाठी रस्ता नाहीये, पावसाळ्यात कुणी आजारी पडले तर झोळी करून काही अंतर चालत घेऊन यावे लागते.
भागाची पाहणी केली, दुरुस्ती बद्दल चर्चा झाली, पिण्याच्या पाण्यासाठी एक नवीन विहीर घ्यावी असा एक विषय समोर आला.
त्यातल्याच एका व्यक्तीने लगेच त्या साठी जागा देण्याची तयारी असल्याचे सांगितले.
नंतर वस्ती शाळेवर आम्ही बैठक घेतली, या कामासाठी सगळ्यांनी श्रमदानाची तयारी असल्याचे सांगितले. ज्यांच्या शेतात विहीर घ्यायची ते आजोबा तर लगेच जागा आखून देण्याच्या तयारीत होते.
शेवटी जेवण घेतले उडदाच्या डाळीचे वरण आणि बाजरीची भाकरी, आपल्या कडील होटेल मधील महागडी डिश.

एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली, आपण ज्यांना आदिवासी म्हणतो ते लोक आपल्यापेक्षा समजूतदार आहेत, आपसात सलोखा जास्त आहे, निसर्गात आपल्या पेक्षा अजून जीव आहेत आणि त्यांच्या सोबत जगायचे आहे हे भान आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!