Home > सामाजिक > शेतकऱयांचा मॉल

सहकार बुडला म्हणताना आपण कोणाला दोष दिला तर आपल्यालाच. तुम्हाला माहिताय सहकार म्हणजे नक्की काय आहे. सहकार म्हणजे तुझ आणि माझं. आपलं. आपल्या असण्याला आपण दोष देत बुडवत गेलो.

पण काही माणसं आहेत जे सहकारतनं उद्याचं स्वप्न बघतायत. ती व्यवस्थेला दोष न देता. आपल्या हातात शक्य आहे ते करतायत.

असच एक उदाहरण म्हणजे श्रीकांत पाटलांच. श्रीकांतनं इंजनिरिंग केलं. नंतर तो बाहेर गेला. रग्गड पैश्याची नोकरी केली. तथाकथित सेटल होण्याच्या सगळ्या व्याख्या पुर्ण केल्या. जमलं असत आपल्या सगळ्यांना जमत तस. पण तो परत फिरला. गावात आला आणि शेतकऱ्यांना गोळा केलं. म्हणला आपलं मार्केट आपण तयार करू. पिकवायचं आपण आणि घ्यायचं आपण. सगळच स्वस्तात मिळेल आणि मालक आपणच असू.

सुरवातीला लोकांनी संशय व्यक्त केला. नंतर प्रामाणिकपणा पाहून भांडवल गुंतवण्यास चालू केलं. हळूहळू सहकारानं आपली ताकद दाखवली आणि तासगावच्या माळावर तयार झालं शेतकरी मार्केट.

शेतकऱ्यांनी बांधलेला स्वःतच माॅल. जिथ शेतकरी आपला फेटा ताठ करतच आत शिरतो. कारण हा माॅल प्रत्येकाचा आहे.
Shrikant Patil – 7709930155

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!