Home > Uncategorized > मुक्काम पोस्ट आफ्रिका..

“कंच्या गावचं पाव्हन ? आन हिकडं कुणीकडे निघालाय ? “असा प्रश्न माझे वडील आमच्या घरापुढील लिंबाच्या झाडा खाली विसावलेल्या प्रत्येक नवख्या गाडीवानाला विचारत.
“आंबीचे जगताप ” अस एखाद्या ने सांगितले की “जगताप ,तुम्ही मूळ सासवडचे कि आंबळ्याचे ?”.
सासवडचे सांगितले की तुम्ही पाटलाच्या वाड्यातले कि देशमुखांच्या ? अश्या प्रश्नातून नात्याचा धागा लागे पर्यंत चौकशी चाले .गावातल्या जाती, पोटजाती तर सूर्या सारख्या ठसठसीट दिसत .
नोकरीत एकाच पोलीस दलातील कनिष्ठ व वरिष्ठ कर्मचारी / अधिकारी ,एका तलम पण पारदर्शक खाकी कापडात गुंडाळलेल्या /बांधलेल्या भगव्या, हिरव्या, निळ्या,(पुन्हा प्रत्येकात अनेक शेड्स असलेल्या )काचेच्या गोट्या प्रमाणे आपला रंग दाखवत अगर कायम राखण्याचा प्रयत्न करताना पहिले होते.परदेशात राहणाऱ्या मित्राच्या नातवाने ते व्हाइट व आपण ब्राऊन हा फरक मला समजावून सांगितला होता .आपले विरुद्ध त्यांचे.आपण कोण?ते कोण ? ….हा वाद अनंत काळा पासून चालू आहे .पण तो वाद शाश्रज्ञानी सोडवलाय!!
पृथ्वीवरील सर्व मानव प्राणी (म्हणजे आपण सर्व जण -माझे मित्र सत्यपाल सिंह सह) ज्यांना शाश्रीय भाषेत ‘होमो सॅपियन ‘ म्हटले जाते ते सुमारे 130000 वर्षा पूर्वी उत्क्रांत झाले. “आफ्रिकेत “!!.तिथून ते जगभर पसरले. भारतात तो 47000 वर्षा पूर्वी पोचला !!
या शाश्रीय सिद्धांताची झलक तुम्हाला
कुडाची शाळा मोरगाव येथे 14 ते 19 फेब दरम्यान भरणाऱ्या शैक्षणिक जत्रेत पहायला मिळणार आहे.
– सुरेश खोपडे.

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!